रविवार, नोव्हेंबर 29, 2026
Home स्थानिक बातम्यागोंडपिपरीकन्हाळगांव अभयारण्याचा ताबा आता ताडोबा अंधारी वाघ्र पकल्पाकडे | वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केला आंनद

कन्हाळगांव अभयारण्याचा ताबा आता ताडोबा अंधारी वाघ्र पकल्पाकडे | वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केला आंनद

by संतोष कुंदोजवार
0 comments

गोंडपिपरी

राज्यातील पन्नासावे बहुचर्चीत कन्हाळगांव अभयारण्याचा ताबा आता ताडोबा अंधारी वाघ्र पकल्पातील बफर झोन कडे देण्यात आला आहे.याबाबतचे निर्देश राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.श्रीनिवास रेडडी यांनी जारी केले आहेत.त्यांच्या या आदेशामुळे गेल्या अनेक वर्षापासून या जंगलाचा ताबा आता वनविकास महामंडळाला सोडावा लागणार आहे.या निर्णयाबाबत वन्यजीवंप्रेमीनी आंनद व्यक्त केला आहे.

सन 2021 मध्ये गोंडपिपरी तालुक्यातील कन्हाळगांव येथे अभयारण्याला मंजूरी देण्यात आली.पण तब्बल पाच वर्ष लोटूनही या अभयारण्याचा ताबा हा वनविभागाकडे देण्यात आला नव्हता.वनविकास महामंडळ याठिकाणी ठाण मांडून बसला होता.अशात या अभयारण्याचा कुठलाच विकास होउ शकला नाही.
यादरम्यान अनेकंानी या अभयारण्याचा विरोध केला.काही दिवसाअगोदरच सुधीर मुनगंटीवार यांनी सदर अभयारण्य रदद करण्याबाबतची मागणी केली होती.मात्र आता शासनाने आता याबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.या अभयारण्याचा ताबा आता ताडोबा अंधारी वाघ्र पकल्पाकडे असणार आहे.येत्या आठ दिवसात हि प्रकिया पार पाडण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत.

अनेक दशकांचा प्रवास संपला
वनविकास महामडंळाची स्थापना झाल्यापासून कन्हाळगाव येथे वनविकास महामंडळाच्या माध्यमातून जंगलाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळण्यात येत होती.गेली अनेक दशकांचा हा प्रवास आता मात्र थांबणार आहे.
वाघांची लक्षणीय संख्या
कन्हाळगांव अभयारण्यात वाघांची लक्षणीय संख्या आहे.येथे अनेक दुर्मीळ प्राणी,पशूंचे वास्तव आहे.ताडोबा,इंद्रावती,व कावल या महत्वाच्या वन्यप्रकल्पांना जोडणारा हा महत्वाचा दुवा आहे.

You may also like

Leave a Comment


Install App

Install our app on your home screen for quick and easy access when you're on the go.