रविवार, नोव्हेंबर 29, 2026
Home स्थानिक बातम्याराजुराराजुरा जि.प हायस्कुल येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी निमित्य कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा

राजुरा जि.प हायस्कुल येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी निमित्य कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा

by संतोष कुंदोजवार
0 comments

राजुरा (प्रतिनिधी)-

स्थानिक जिल्हा परिषद(मा.शा.) माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय येथे दि.28नोव्हेंबर रोजी ” तालुका विधी सेवा समिती राजुरा अंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा व महात्मा फुले यांची पुण्यतिथी कार्यक्रम पार पडला
या कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी प्राचार्य किशोर उईके होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून
राजुरा दिवाणी व फौजदारी न्यायाधीश वर्ग (1) चे आशु पटेल,राजुरा बार असोशिअन चे अध्यक्ष ऍड. चंद्रमणि वाघमारे,सदस्य ऍड.प्रशांत तेलकापल्लीवार हे होते तर माजी प्राचार्य रामेश्वर डोर्लीकर,सुदर्शनजी दाचेवार,मधुकर चापले,पावडे गुरुजी अतिथी म्हणून उपस्थित होते
महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले,बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले
यानंतर ऍड चंद्रमणी वाघमारे यांनी “बालविवाह कायद्याअंतर्गत व त्याचे दुष्परिणाम” याविषयावर माहिती दिली तर ऍड.प्रशांत तेलकापल्लीवार यांनी बाल संरक्षण तथा बाल हक्क कायदा त्याची कलमे बाबत मार्गदर्शन केले आणि दिवाणी आणि फौजदारी वर्ग 1 चे न्यायाधीश कु.आशु पटेल यांनी पोक्सो कायद्याबाबत सविस्तरपणे मार्गदर्शन केले,यावेळी विद्यार्थ्यांना बाल संरक्षण व हक्क,पोक्सो कायदा,इतर प्राथमिक कायदा व सम्पर्क माहिती पुस्तिका वाटप करण्यात आले
सदर कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका भावना मडावी यांनी केले प्रास्ताविक क्रीडा शिक्षक संतोष कुंदोजवार यांनी केले तर संजय गोखरे यांनी आभार मानले याप्रसंगी सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजुरा न्यायालयातील श्री शेंडे, श्री बागडे,शिक्षक वृंद अरुण मुसळे , शैलेश तेलंग , लता मडावी , गिरीश येवले , मोनाली पाचघरे , गहूकर , सौ अहिरे,बापूजी सोनुले डॉ. अफरोज बॅग. खान मॅडम, सुरेश कलपल्लीवार,मनीषा गहुकर,,स्मिता पुणेकर,,बंदाली सर   तसेच वर्ग 9 (अ)चे विद्यार्थी यांचे विशेष सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन वर्ग 9 वा (अ) च्या विद्यार्थ्यांनी केले उत्कृष्टरित्या केले

You may also like

Leave a Comment


Install App

Install our app on your home screen for quick and easy access when you're on the go.