रविवार, नोव्हेंबर 29, 2026
Home स्थानिक बातम्याराजुरादिवाणी केस प्रलंबित असली तरी नोकरी रोखता येणार नाही, सातबारा वरील मुळ मालकांना नोकरी देणे अनिवार्य

दिवाणी केस प्रलंबित असली तरी नोकरी रोखता येणार नाही, सातबारा वरील मुळ मालकांना नोकरी देणे अनिवार्य

उच्च न्यायालयाचे वेकोलीला आदेश

by संतोष कुंदोजवार
0 comments

राजुरा, (प्रतिनिधी)-
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक महत्त्वपूर्ण निर्णय देत वेकोलीला स्पष्ट निर्देश देत संपादित जमिनीबाबत दिवाणी न्यायालयात प्रलंबित वाद असल्याचे कारण देऊन नोकरीची प्रक्रिया थांबविणे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे आहे. जमीन संपादित झालेल्या दिवशी सातबारा अभिलेखावर ज्यांची नावे नोंद होती, त्या मूळ मालकांच्या वारसांनाच मोबदला आणि नोकरीचा अधिकार असून, केवळ कोर्टातील खटल्याचे कारण देऊन त्यांना नोकरीपासून दूर ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले. याचिकाकर्त्यांच्या बाजूने ॲड. दीपक चटप आणि ॲड. वैष्णव इंगोले यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला.
ॲड. दीपक चटप यांनी वेकोली अधिग्रहणानंतर दाखल झालेल्या दिवाणी खटल्यांचा आधार घेत वेकोलि वर्षानुवर्षे नोकरी रोखत असल्याचे निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करत वेकोलीला आठ आठवड्यांच्या आत नोकरीसंदर्भातील आदेश जारी करण्याचे निर्देश दिले.
या निर्णयामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या संबंधित शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. वेकोलीकडून केवळ प्रलंबित खटल्याचे कारण देत सातत्याने होणारी टाळाटाळ न्यायालयाने थांबवली असून संबंधित शेतकऱ्यांच्या हक्काच्या नोकरीचा मार्ग खुला झाला आहे. या निर्णयाचे प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी स्वागत केले आहे.

“शेतकऱ्यांची जमीन संपादित करून त्यांना नोकरी देणे ही वेकोलीची कायदेशीर जबाबदारी आहे. कोर्ट केसचे कारण देऊन अनेकांना वर्षानुवर्षे त्रास दिला जात होता. उच्च न्यायालयाचा निर्णय हा शेतकरी हिताचा आणि न्याय पुनर्स्थापित करणारा आहे. यापुढे वेकोलीने शेतकऱ्यांना त्रास देऊ नये.”
– ॲड. दिपक चटप
युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष, शेतकरी संघटना, महाराष्ट्र.

You may also like

Leave a Comment


Install App

Install our app on your home screen for quick and easy access when you're on the go.