राजुरा(प्रतिनिधी)-
नागपूर वरून राजुरा मार्गे कागजनगर कडे जात असताना रात्री. साडे बाराचे सुमारास मार्गातील सोंडो गावाजवळील वळणपुलावरून कारने पुलाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गँभिर आहेत मृतक कागजनगर येथील असल्याचे समजते
कागजनगर येथील कुटूंब नागपूर येथे उपचार घेत असलेल्या कटुबातील नातलगास बघण्यास Ts 02 EN 5544 क्रमांकाचे कारने गेले होते ,परतीचा मार्ग म्हणून रात्रीच राजुरा,आशिफाबाद मार्गे कागजनगर ला निघाले मार्गातील सोंडो गावाजवळील वळण असलेल्या नाल्यावरून जाताना कार अनियंत्रित झाली आणि पुलाचे कठळ्यांना धडक देत पुलाखाली कोसळली या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला अफसा शबरीन वय 12 वर्ष,सायरा बेगम 42 वर्ष,सलमा बेगम 45 वर्ष,अफजल बेगम 55 वर्ष,असे मृतकाचे नाव आहे तर नुसरत बेगम,नजहत बेगम,साहिन निशा, असे जखमींची नाव आहेत ते कागजनगर येथील रहिवासी असल्याचे समजते
अपघात रात्री उशिरा झाल्याने मदत मिळण्यास उशीर झाला आणि अंधार असल्याने मदत कार्यात अडचण येत होती असे सांगण्यात येते,याप्रकरणी राजुरा पोलीस पुढील तपास करीत आहेत

सध्या महामार्गाचे काम सुरू असून घटनास्थळाचा भाग वाहन चालविताना धोकादायक आहे यापूर्वी सुद्धा या ठिकाणी अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत असे असतानाही महामार्ग प्रशासन किंवा संबधित ठेकेदाराकडून सुरक्षे बाबत कोणत्याही सुविधा नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे
