रविवार, नोव्हेंबर 29, 2026
Home मत / लेखजीवन म्हणजे थांबणं नाही, तर पुन्हा उभं राहणं

जीवन म्हणजे थांबणं नाही, तर पुन्हा उभं राहणं

प्रत्येक व्यक्तीच्या सन्मान, स्वातंत्र्य आणि समानतेचा आवाज जगभर पोहोचवणारा दिवस

by अश्विनी जी.
0 comments

आयुष्य हे सरळ रेषेत चालणारं नसतं. कधी आनंदाची ऊन, तर कधी दुःखाचा पाऊस… पण या दोन्हींतूनच माणूस घडत जातो. जेव्हा सगळं आपल्याविरुद्ध जातं, तेव्हाच आपली खरी ताकद समोर येते.

अपयश आलं म्हणून थांबायचं नसतं. कारण अपयश हे शेवट नसून, नव्या सुरुवातीची सूचना असते. प्रत्येक जखम आपल्याला कमकुवत करत नाही, काही जखमा आपल्याला शहाणं करतात.

लोक काय म्हणतात यापेक्षा, आपण स्वतःला काय म्हणतो हे महत्त्वाचं आहे. स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूस कधीच हरत नाही. वेळ लागेल, संघर्ष येईल, पण प्रयत्न करणारा कधीच रिकाम्या हाताने परतत नाही.

आज नाही जमलं, तर उद्या जमेल. उद्या नाही जमलं, तर परवा नक्की जमेल. कारण जिद्द असली की, आयुष्यालाही वाकावं लागतं.

स्वतःसाठी उभं राहा. स्वतःवर प्रेम करा. कारण तुमचं आयुष्य हे तुम्हीच सुंदर बनवू शकता.

“हार मानणं सोपं असतं, पण उभं राहणं हेच खरं धैर्य 

You may also like

Leave a Comment


Install App

Install our app on your home screen for quick and easy access when you're on the go.