गोंडपिपरी(तालुका प्रतिनिधी)-
येत्या 26 जानेवारी रोजी 76 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा सोहळा दिल्ली येथे संपन्न होणार आहे.या सोहळयासाठी विशेष अतिथी म्हणून राज्यातील सोळा सरपंचांची निवड करण्यात आली आहे.यात चंद्रपूर जिल्हयातील सोनापूर देशपांडे ग्रामपंचायतीच्या सरपंच जया दिपक सातपुते यांना हा सन्मान मिळाला आहे.त्यांना मिळालेल्या या विशेष मानामुळे परिसरात अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सोनापूर देशपांडे हे चंद्रपूर जिल्हयातील गोंडपिपरी तालुक्यातील तेंलगणा सिमेलगत असलेल छोटस गावं आहे. जया दिपक सातपुते या गावच्या सरपंच आहेत.त्यांनी आपल्या कारकीर्दीत विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले.गावाचा सर्वागिंण विकास साधण्याचे उधिष्टये ठेवीत त्यांनी प्रभावी नियोजन केले.हागणदारी गाव अंतर्गत स्वच्छ भारत मिशन मोहिम त्यांनी यशश्वी केली.स्मार्ट ग्राम अभियानात उत्कृष्ट कार्य करित 2019-20 मध्ये या ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकविला.संत गाडगेेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचा तालुकास्तरीय पुरस्कार पटकविला.केंद्र शासनाच्या पेपरलेस अभियानात अतिशय उत्तम कामगिरी करित चंद्रपूर जिल्हयातून पहिली पेपरलेस ग्रामपंचायतीचा मान जया सातपुते यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत सोनापूरला मिळाला.गावातील शाळा आदर्श होण्याच्या मार्गावर असून महिला बचत गटांच्या माध्यमातून रोज ग्रामसफाईचे काम गावात केली जातात.सौर उर्जेचा वाफर करित स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे.याचसोबत ग्रामविकासाचे अनेक कामे जया दिपक सातपुते यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहेत.त्यांच्या या कार्याने तेलंगणा सिमेवरील या छोटयाशा गावाने संपूर्ण राज्यात आपल्या कामाचा डंका वाजविला आहे.येत्या 26 जानेवारी रोजी दिल्ली येथे 76 वा भारतीय प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साही वातावरणात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातील फक्त सोळा सरपंचाना विशेष अतिथी म्हणून सन्मान दिला जाणार आहे.यात सोनापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच जया दिपक सातपुते यांचाही समावेश आहे.जया सातपुते व त्यांचे पती दिपक सातपुते या दोघांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण केंद्रातून धाडण्यात आले आहे.एका अतिशय लहानश्या गावातील सरंपचांना त्यांच्या कार्यकुशलतेच्या बळावर हा सन्मान मिळाल्याची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.