जिवती(प्रतिनिधी)-
जिवती वनपरिक्षेत्र अंतर्गत विविध कामावरील रोजंदारी वनमजुराचे मागील 5 महिन्यापासून मजुरी मिळाली नसल्याने कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले आहे ,अधिकार्याचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत आमदार देवराव भोंगळे यांना मागणीचे निवेदन दिले.
मध्य चांदा वन विभाग अंतर्गत कोठारी,जिवती,पोंभुरणा,धाबा,वनसडी,विरुर,बल्हारशाह,राजुरा,या वनपरिक्षेत्र अंतर्गत विविध वनक्षेत्र कामासाठी सुमारे 75 रोजंदारी वनमजूर कार्यरत आहेत परंतु जिवती सह इतर वनक्षेत्रातील या रोजंदारी वनमजुराचे मजुरी मागील 5 महिनेपासून देण्यात आलेले नाही त्यामुळे कुटूंबातील खर्च,शिक्षण,आरोग्य खर्च करताना जीवन नाकीनऊ होत आहेत याबाबत वरिष्ठ वनाधिकार्याना अनेकदा भेटून विनंती करूनही या अधिकाऱ्याकडून दुर्लक्ष होत आहे उपाशी पोटी कुटूंबाकडे दुर्लक्ष करीत वन संरक्षण तरी कसे करायचा असा प्रश्न आवासून उभा आहे,तसेच डिसेंबर 2025 पासून बंद करण्यात आलेल्या वन मजुरांना परत कामावर घेण्यात यावी थकीत 5 महिन्याचा पगार तात्काळ देण्यात यावा अश्या मागणीचे निवेदन आमदार देवराव भोंगळे यांना जिवती वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या विष्णू जाधव,गणेश राठोड, भानुदास चव्हाण,गोकुळ जाधव व इतर क्षेत्रीय रोजंदारी वनमजुरांनी दिले आहे
जिवती वनक्षेत्रातील वनमजुरांनी आमदारांना दिले निवेदन.
5 महिन्यापासून मजुरीच्या प्रतीक्षेत रोजंदारी वनमजूर.!
659
previous post