रविवार, नोव्हेंबर 29, 2026
Home स्थानिक बातम्याराजुरारेल्वेच्या धडकेत मादी बिबटचा मृत्यू.

रेल्वेच्या धडकेत मादी बिबटचा मृत्यू.

राजुरा वनपरिक्षेत्राचे चनाखा बिटातील घटना.

by संतोष कुंदोजवार
0 comments

राजुरा(संतोष कुंदोजवार)-

चनाखा वनक्षेत्रातून जाणाऱ्या बल्हारशाह ते काझीपेठ या दक्षिण मध्य रेल्वे ट्रॅकवर रेल्वेच्या धडकेत सुमारे दीड वर्षे वयाची मादी बिबटचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडे आठच्या सुमारास उघडकीस आली.
राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत विहिरगाव उपवनक्षेत्र चनाखा नियतवनक्षेत्राचे कक्ष क्रमांक 160 मधून दक्षिण मध्य रेल्वे लाईन गेलेली आहे या परिसरातूनच नेहमी वनप्राण्याचा वावर होत असल्याने आणि वन्यजीव वन्यप्राण्यांचे सरक्षणसासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने आतापर्यंत वाघ,बिबट,अस्वल,चितळ आदी अश्या 9 पेक्षा अधिक वन्यप्राण्यांचा बळी गेला आहे.
आज दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळच्या साडे आठ च्या सुमारास बिबट वन्यजीव रेल्वेच्या धडकेत मृत झाल्याचे माहिती मिळाली माहिती मिळताच वनाधिकारी ,वनपरिक्षेत्र अधिकारी,वनकर्मचारी ,पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी धाव घेऊन मोका पंचनामा केला.
पशुवैद्यकीय अधिकारी एन पी तेलंग यांनी शवविच्छेदन केले पुढील तपास सुरू आहे.

You may also like

Leave a Comment


Install App

Install our app on your home screen for quick and easy access when you're on the go.