10 सायकल सह इतर साहित्याची चोरी.
राजुरा(प्रतिनिधी)-
स्थानिक जिल्हा परिषद हायस्कुल च्या इमारतीतून निकष पात्र विद्यार्थ्यांसाठी असणारे 10 सायकल 2 सिलिंग आणि इन्व्हर्टर ची बॅटरी चोरांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे
शाळेची वापरात नसलेल्या इमारतीत निकष पात्र विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी आलेल्या सायकल आणि इतर साहित्य ठेवण्यात आले होते व कुलूपबंद करण्यात आले परंतु सध्या शाळा बंद असल्याने त्याचा चोरट्यांनी फायदा घेत त्या इमारतीचे कुलूप तोडून येथे असलेल्या 10 सायकल ,दोन सिलिग पंखे,एक इन्व्हर्टर ची बॅटरी चोरांनी चोरून नेली
ही बाब नुकतेच शाळा मुख्याध्यापक यांनी या इमारतीच्या पाहणी केली असता चोरीची घटना उघडकीस आली याबद्दल राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

यापूर्वी सुद्धा या शाळेतून कुलूप फोडून 25 हजार रुपयांची क्रीडा साहित्य व उर्दू माध्यमाचे साहित्याची चोरी झाली होती शाळा सुटल्यावर रात्री अंधारात या शाळेच्या मैदानात अवैध कारभार सुरू असतो,दारू पिणारे,गांजा पिणाऱ्या चा धिंगाणा असतो याबद्दल पोलिसात अनेकदा माहिती देऊनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे परिणामी शाळेच्या इमारतीतून चोरी करण्यापर्यंत मजल मारली आहे ,असा प्रकार शहरातील अनेक शासकीय कार्यालय परिसरात रात्री सुरू असतो,परंतु राजुराचे डीबी पथकचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वसासमान्य जनतेला,विद्यार्थ्याना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे नवीन आलेले ठाणेदार तरी याची दखल घेतली काय याकडे लक्ष लागले आहे