रविवार, नोव्हेंबर 29, 2026
Home स्थानिक बातम्यापोंभुर्णामध्य चांदा पोंभुरणा वनक्षेत्रातील पिपरी दीक्षित येथे वाघाचा संशयास्पद मृत्यू?

मध्य चांदा पोंभुरणा वनक्षेत्रातील पिपरी दीक्षित येथे वाघाचा संशयास्पद मृत्यू?

गस्ती दरम्यान घटना आली उघडकीस.

0 comments

गस्ती दरम्यान घटना आली उघडकीस

राजुरा(प्रतिनिधी)-

मध्य चांदा वन विभाग पोंभुरणा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या घोसरी उपक्षेत्राचे पिपरी दीक्षित नियतवन क्षेत्रात एका वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली असून वरिष्ठ वन अधिकाऱ्यासह पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत
पोंभुरणा वनपरिक्षेत्राचे पिपरी दीक्षित नियतवन क्षेत्रात वाघाने 12 जून रोजी चार म्हशीं वर हल्ला केल्याची घटना घडली होती त्यामुळे परिसरात वाघाची भीती पसरली होती त्यामुळे वनकर्मचार्यानी नियमित गस्त सुरू केली होती दरम्यान आज सकाळीच पिपरी दीक्षित येथील संरक्षित वन कक्ष क्रमांक 543 मध्ये असलेल्या तलावातील झुडुपात दुर्गंधी येत असल्याने जाऊन बघितले असता नर वाघ मृतावस्थेत आढळून आला वाघाचा मृत्यू दोन दिवस अगोदर झाला असावा असे घटनास्थळावरून अंदाज व्यक्त करण्यात येत आहे
घटनेची माहिती वरिष्ठ वणाधिकार्याना मिळताच उपविभागीय वन अधिकारी मंगेश गिरडकर,वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत राखुंडे,पशु वैद्यकीय अधिकारी ,व इतर वनकर्मचारी घटनास्थळी पोहचले आहेत वाघ नर असून सर्व अवयव शाबूत आहेत परंतु मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाला नंतरच स्पष्ट होईल असे वन अधिकाऱयांनी सांगितले आहे

You may also like

Leave a Comment


Install App

Install our app on your home screen for quick and easy access when you're on the go.