रविवार, नोव्हेंबर 29, 2026
Home स्थानिक बातम्याजिवतीअवैधरित्या मुरूम उत्खनन प्रकरणी एक जेसीबी सह दोन ट्रॅक्टर जप्त

अवैधरित्या मुरूम उत्खनन प्रकरणी एक जेसीबी सह दोन ट्रॅक्टर जप्त

जिवती वनकर्मचार्याची कारवाई

by संतोष कुंदोजवार
0 comments

राजुरा(तालुका प्रतिनिधी)-


जिवती वनपरिक्षेत्र च्या वणी उपवनपरिक्षेत्रात शाळा बांधकामासाठी अवैधरित्या वनक्षेत्रात उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या एक जेसीबी आणि दोन ट्रॅक्टर मुद्देमालासह जप्त करून वन गुन्हा नोंदविला आहे
मध्य चांदा वन विभाग अंतर्गत जिवती वनपरिक्षेत्रात येणाऱ्या दंमपूर मोहदा वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक 408 मध्ये ही कारवाई करण्यात आली ,मिळालेल्या माहितीनुसार 9 मार्च चे मध्यरात्री वनकर्मचारी गस्तीवर असताना जिवती ते दमपूर मार्गादरम्यान काही इसम संशयास्पद फिरत असताना आढळून आले त्यांचा संशय आल्यावरून विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तर दिली दरम्यान दंमपूर मोहदा गावाजवळून वनक्षेत्राचे कक्ष क्रमांक 408 मध्ये जेसीबी च्या सहायाने अवैधरित्या मुरुमाची उत्खनन करून ट्रॅक्टर मध्ये भरून नेत असल्याचे आढळून आले याबद्दल यावेळी उपस्थित व्यक्तींना विचारणा केली असता दंमपूर मोहदा येथील पन्नाबाई माध्यमिक आश्रमशाळेच्या नवीन इमारत बांधकामासाठी मुरूम वाहतुक करीत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले
त्यावरून मोका पंचनामा करीत एक जेसीबी सह दोन ट्रॅक्टर जप्त करून वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे
ही कारवाई उपवनसंरक्षक योगेश वाघाये ,उपविभागीय वन अधिकारी मंगेश गिरडकर यांचे मार्गदर्शनात जीवतीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे,वनसडी चे वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही ए राजूरकर आणि जिवती व वनसडी च्या वनपाल,वनरक्षक,वनमजुरांनी संयुक्तपणे केली आहे

You may also like

Leave a Comment


Install App

Install our app on your home screen for quick and easy access when you're on the go.