राजुरा(प्रतिनिधी)-
अमली पदार्थांच्या सेवनापासून युवक व विद्यार्थ्यांना दूर ठेवण्यासाठी राजुरा पोलीस ठाण्याच्या वतीने नशामुक्त जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत स्थानिक जिल्हा परिषद हायस्कुल मध्ये विद्यार्थ्यांसाठी अमली पदार्थविरोधी शपथ कार्यक्रम घेण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागृती निर्माण करणे, व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश देणे तसेच समाजात नशामुक्तीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता. यावेळी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक पराग उल्लीवार यांनी विद्यार्थ्याना व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांना नशामुक्ती शपथ दिली तसेच वाहन सुरक्षितता बाबत सविस्तरपणे मार्गदर्शन केले
यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य किशोर उईके होते यावेळी,सहायक शिक्षक संजय गोखरे,शैलेंद्र तेलंग,सुरेश कलपल्लीवार,क्रीडा निदेशक संतोष कुंदोजवार,सतीश शेंडे,बापूजी सोनूले,विजय जुलमे,शिक्षिका भावना मडावी,लता मडावी,मोनाली पाचघरे,आदी शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते