प्रतिनिधी (तालुका प्रतिनिधी)-
भूत, भानामती,करणी, यांसारख्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून प्रत्येक गोष्टीची सत्यता पडताळून पाहावी, असे आवाहन संतोष कुंदोजवार यांनी केले आहे.
तालुक्यातील सुबई येथील शिवाजी आदिवासी आश्रमशाळा येथे “श्रद्धा व अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन”या विषयावर विद्यार्थ्यासाठी विशेष प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य डी एस झाडे होते,प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी मुख्याध्यापक एस एन मोरे,सहायक शिक्षक पी व्ही नागोसे,व्ही एम धानोरकर,एस एम माशाकर,के जी चिंचोळकर,शिक्षक वनकर, भोयर,शिक्षिका कुमारी कोडापे होते तर पत्रकार तथा प्रबोधनकार संतोष कुंदोजवार हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते
यावेळी संतोष कुंदोजवार यांनी भूत आणि भानामती,अंगात येणे, यांसारख्या गोष्टींच्या अस्तित्वाबाबत समाजात अनेक समज-गैरसमज आढळून येतात. मात्र, अशा दाव्यांवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता त्यांची शास्त्रीय पद्धतीने तपासणी करणे आवश्यक आहे, असे त्यांनी प्रयोगाद्वारे समजावून सांगितले
समाजात आजही अंधश्रद्धेमुळे अनेक गैरसमज निर्माण होतात. काही वेळा भीतीपोटी लोक विविध अघोरी प्रथा आणि चुकीच्या समजुतींना बळी पडतात. अशा परिस्थितीत नागरिकांनी विवेकबुद्धीचा वापर करून सत्य आणि असत्य यांतील फरक ओळखावा. कोणत्याही घटनेमागील कारण समजून घेण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवावा, असे मत यांनी व्यक्त केले.
भूत आणि भानामतीच्या अस्तित्वाबाबत शास्त्रीय पुरावे सादर करण्याचे खुले आव्हान देत त्यांनी समाजात विज्ञाननिष्ठ विचार रुजविण्याची गरज अधोरेखित केली. समाजाने अंधश्रद्धेपेक्षा विज्ञानाची कास धरावी, तसेच नवीन पिढीमध्ये प्रश्न विचारण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची आणि पुराव्यांच्या आधारे निष्कर्ष काढण्याची सवय विकसित करावी, असेही त्यांनी सांगितले.यावेळी त्यांनी हातावर कापूर जाळणे,अंगात शक्ती आणणे,नारळाला आग लागणे,निबातून कपडे निघणे,दूध पिणे,पैसे गायब करणे,पाण्यावर दिवा पेटविणे असे अनेक प्रयोग करून त्यामागील कारण स्पष्टीकरण केले विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून त्यांच्या मनातील गैरसमज दूर करून घेत
प्रतिसाद चांगला दिला या कार्यक्रमात शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक एस एन मोरे, शिक्षक,विदयार्थी उपस्थित हो