राजुरा(प्रतिनिधी)-
वनविकास महामंडळाचे कोठारी जवळील झरण वन वसाहत मधील विहिरीत पडलेल्या बिबट्याला मोठया प्रयत्नानंतर रेस्क्यू करीत बाहेर काढून निसर्गमुक्त करण्यात आले
आज सकाळी वन वसाहतीच्या विहिरीत बिबट पडल्याची वनमजुराचे लक्षात आले त्याची माहिती वरिष्ठ वन कर्मचाऱयांना दिली माहिती मिळताच लोकांची मोठी गर्दी झाली वन विभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी आले आणि विहिरीत पिंजरा सोडून मोठ्या प्रयत्नाने साडे बाराचे सुमारास बाहेर काढण्यात आले त्यानंतर त्या बिबट्याला एका घनदाट जंगलात निसर्गमुक्त करण्यात आले
ही मोहीम वन विभागाचे सहायक वनसंरक्षक आदेशकुमार शेडगे,वन प्रकल्पाचे सहायक व्यवस्थापक कल्पना चिंचखेडे,यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी एस डी मडावी,,फिरते पथक प्रमुख निशांत घोरपडे,वनपाल पी व्ही कर्णेवाड,अविनाश घुगलोत, ज्ञानेश्वर जुमडे,रुपाली मडावी, वनरक्षक अतुल मोहूर्ले, सीमा आत्राम,चालक अभिलाष वैद्य,तेजस चव्हाण,नितेश बावणे आणि इतर वनमजुरांनी यशस्वीपणे केली
ही वसाहत कन्हाळगाव अभयारण्य अंतर्गत जगलव्यप्त वन विकास महामंडळाचे नियंत्रणात आहे त्यामुळे वन्यप्राण्यांचे या वसाहतीच्या जवळ नेहमीच वावर असते