रविवार, नोव्हेंबर 29, 2026
Home गुन्हे वार्ताचितळाचे शिकार प्रकरणी मासाची विल्हेवाट लावताना 3 आरोपींना मुद्देमालासह केले अटक | राजुरा वन विभागाची कारवाई

चितळाचे शिकार प्रकरणी मासाची विल्हेवाट लावताना 3 आरोपींना मुद्देमालासह केले अटक | राजुरा वन विभागाची कारवाई

by संतोष कुंदोजवार
0 comments

राजुरा(प्रतिनिधी)-

राजुरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चुनाला नियत वनक्षेत्रात नर चितळाची शिकार करून त्याची विल्हेवाट लावताना राजुरा वन कर्मचारी यानी धाड टाकून चितळाचे मासासह 3 आरोपींना अटक केल्याची घटना आज दिनांक 27 रोजी सायंकाळी घडली

राजुरा पासून 4 किलोमीटर अंतरावरील चुनाला शिवारात चितळाची शिकार करून त्याच्या मासाची विल्हेवाट करीत असल्याची माहितीवरून राजुरा येथील वनकर्मचारी यांनी घटनास्थळी धाड टाकली यावेळी चितळाची मास शिजवीत असल्याचे आढळून आले तसेच इतर मासाची विक्रीसाठी तुकडे करीत असल्याचे आढळून आले यावेळी 3 आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता आरोपिकडून या शिकारीतील 4 किलो शिजविलेले आणि 15 किलो कच्चे मास,कुऱ्हाड जप्त करण्यात आले
तसेच पिंटू गणपती राघी वय 50 वर्ष राहणार चुनाला,सुरेश चिलमवार,रायमलू लिंगमवार राहणार चुनाला या आरोपींना वन अधिकाऱयांनी अटक केली आले व वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे
ही कारवाई उपविभागीय वन अधिकारी मंगेश गिरडकर ,वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे यांचे मार्गदर्शनात क्षेत्र सहायक संजय गरमडे, वनरक्षक अंकिता नेवारे,गीता चव्हान,मीनाक्षी सातपुते,तानाजी कामले,भोजराज दांडेकर,पवन मांदुलवार,मारोती चापले, वनमजुर गंगाधर मोहितकर, संतोष कींनाके,बलदेव मेश्राम ,नरेश निखाडे,गंगाधर सोपनकर यांनी केली

You may also like

Leave a Comment


Install App

Install our app on your home screen for quick and easy access when you're on the go.