वरोरा(प्रतिनिधी)-
येथील संस्कार भारती पब्लिक स्कूल मध्ये पहिल्यांदाच पदवी प्रदान समारंभ पूर्व प्राथमिक वर्गासाठी आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अपेक्षा मालू तर प्रमुख मार्गदर्शक प्राचार्या राणी पटेल, उपप्राचार्या श्रद्धा चौबे तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन पालक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्रिती शास्त्रकार यांनी केले.
संस्कार भारती पब्लिक स्कूल मध्ये पदवी प्रदान समारंभ हा नर्सरी ते युकेजी वर्गासाठी आयोजित केला होता. या कार्यक्रमामुळे पालकांनी आपल्या पाल्यांला डिग्री ड्रेस मध्ये पाहून अत्यंत आनंदी व उत्साही झाले त्याचप्रमाणें आपल्या पाल्याला भावी इंजिनियर, डॉक्टर, जिल्हाधिकारी व इतर अशा रूपात अनुभवायला लागले. पदवी प्रदान समारंभ हा विद्यार्थ्याच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा दिवस असतो. यावेळी विद्यार्थ्याला एक एक करून स्टेजवर बोलावून त्याला डिग्री सर्टिफिकेट आणि पुष्पगुच्छ देऊन पालकासमवेत सन्मानित केले गेले त्यानंतर विद्यार्थी आणि पालकांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमामध्ये प्राचार्या राणी पटेल मॅडम यांनी मार्गदर्शन केले आभार प्रदर्शन उज्वला झंजल यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी पार पडण्याकरिता सारिका दातारकर, भाग्यश्री फेतफुलवार शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.