रविवार, नोव्हेंबर 29, 2026
Home स्थानिक बातम्यागडचांदुरबैलगाडीला धडक बसून मुख्याध्यापक सुभाष बेरड यांचा जागीच मृत्यू; शैक्षणिक क्षेत्रात शोककळा

बैलगाडीला धडक बसून मुख्याध्यापक सुभाष बेरड यांचा जागीच मृत्यू; शैक्षणिक क्षेत्रात शोककळा

by संतोष कुंदोजवार
0 comments

गडचांदूर (प्रतिनिधी)– गडचांदूर येथील रहिवासी तथा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कढोली ( खु.) येथील मुख्याध्यापक सुभाष बेरड (वय ५७) यांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. ही घटना गडचांदूर–भोयगाव महामार्गावर लखमापूर येथील आस्वले पेट्रोल पंपाजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष बेरड हे मोटारसायकलने सहायक शिक्षक सुनील दुर्गे सोबत गडचांदूरवरून चंद्रपूरकडे जात असताना रस्त्यात अचानक समोर आलेल्या बैलगाडीला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, ते महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना (शिवाजीराव पाटील) शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष होते. चंद्रपूर येथे मुलीच्या घरी आयोजित विवाह स्वागत समारंभासाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे.
सुभाष बेरड हे कर्तव्यनिष्ठ व विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय मुख्याध्यापक म्हणून ओळखले जात होते. तसेच ते गडचांदूर जि. प. शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या कार्याला दिशा मिळाली होती.
त्यांच्या आकस्मिक निधनामुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून गडचांदूर परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.

You may also like

Leave a Comment


Install App

Install our app on your home screen for quick and easy access when you're on the go.