पोलीस वर्धापनदिन निमित्य शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

राजुरा (प्रतिनिधी)-
पोलीस वर्धापन दिन निमित्य जील्हा परिषद हायस्कुल राजुरातील हरित सेना पथकाचे विध्यार्थ्यानी राजुरा पोलीस ठाण्यात भेट दिली यावेळी पोलीस विभाग बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.


यावेळी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत पवार,पोलीस उपनिरीक्षक अतुल राठोड, हवालदार नागनाथ भेंडेकर,संदीप बुरडकर यांनी मार्गदर्शन केले.


विशेष म्हणजे महिला पोलीस उपनिरीक्षक कोमल घाडगे यांनी सर्व विद्यार्थिनींना पूर्णपणे पोलीस स्टेशन मधील विभाग व अधिकारी,त्याची कामे,प्रत्येक खोली तसेच पोलीस कस्टडी तसेच मुलींच्या संरक्षणासाठी असणारे कायदा तसेच पोलीस भरती ,स्पर्धा परीक्षा बाबत हसत खेळत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी क्रीडा शिक्षक संतोष कुंदोजवार,शिक्षिका मनीषा गहूकर, कार्यानुभव शिक्षक बापूजी सोनूले उपस्थित होते.

Related posts

राजुरा जि.प हायस्कुल येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी निमित्य कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा

कापूस वेचताना मधमाश्यांचा हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर | गोंडपीपरी तालुक्याचे लाठी गावातील घटना

प्रश्न विचारणारेच इतिहास घडवतात; जिद्दीने अशक्यही शक्य होते! | न्यूटनच्या जिज्ञासेपासून शिवरायांच्या दूरदृष्टीपर्यंत प्रा. बानगुडे-पाटील यांनी उलगडले यशाचे सूत्र