जिल्ह्यात 24 तासात वाघाचे हल्यात दोघांचा मृत्यू

राजुरा(प्रतिनिधी)-
गेल्या 24 तासात वेगवेगळ्या ठिकाणी वाघाचे हल्ह्यात दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्या आहे मूल तालुक्यातील मारोडा येथील सुनीता भोयर आणि मोहूरली वनक्षेत्रातील पद्मापुर(वरवट) येथील काशिनाथ लोंनबले असे मृतकाचे नाव आहेत
दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी वरवट येथील काशिनाथ शिवराम लोणबले वय 68 वर्ष सरपण आणण्यासाठी गेले असता नाल्यात दबा धरून असलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले आणि पद्मापुर वनक्षेत्राचे कक्ष क्रमांक 179 मध्ये ओढत नेले याची माहिती मिळताच मोहूरली वनक्षेत्राचे वन अधिकारी घटनास्थळी पोहचून पुढील कार्यवाही केली
तसेच आज सकाळी मुल तालुक्यातील मारोडा येथील सुनीता शामराव भोयर वय 45 वर्ष ही आमटे फार्म परिसरात कापूस वेचणीसाठी गेली असता वाघाने तिच्यावर हल्ला करून ठार केले माहिती मिळताच मुल येथील वनकर्मचारी ,पोलीस घटनास्थळी धाव घेतली
24 तासात वाघाच्या हल्यात दोघांचा बळी गेला असल्याने भीतीचे वातावरण असून अजून वाघ आणि मानव या संघर्षात किती जीव जाणार ?असा प्रश्न जनतेत विचारला जात आहे

Related posts

राजुरा जि.प हायस्कुल येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी निमित्य कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा

कापूस वेचताना मधमाश्यांचा हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर | गोंडपीपरी तालुक्याचे लाठी गावातील घटना

प्रश्न विचारणारेच इतिहास घडवतात; जिद्दीने अशक्यही शक्य होते! | न्यूटनच्या जिज्ञासेपासून शिवरायांच्या दूरदृष्टीपर्यंत प्रा. बानगुडे-पाटील यांनी उलगडले यशाचे सूत्र