सामाजिक दायीत्व जोपासणे हि सार्वजनिक जबाबदारी – उल्हास करपे …

गोंडपिपरी(तालुका प्रतिनिधी)-
भौतिक सुखाच्या या काळात माणुसकीची जाण ठेवणारी माणस दुर्मीळ झालीत.पण या व्यवस्थेत संवेदनशिल माणसांनीच समाजव्यवस्थेची नाळ कायम ठेवली आहे.त्यांचीच प्रेरणा समाजासाठी उर्जा तर देतेच सोबत प्रेमाची भावही देउन जाते.आपल्या जिवाची बाजी लाउन तीन चिमुकल्याचे जिव वाचविणारे युवा कार्यकर्ते साईनाथ कोडापे यांचे कार्य या संपूर्ण प्रकाराची अनुभूती देतात.असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे संचालक तथा जेष्ठ सहकार नेते उल्हास करपे यांनी व्यक्त केले.

गोंडपिपरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने स्थानिक शेतकरी भवनात मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते.बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धुडसे यांनी या कार्यक्रमाचे उदघाटन केले.युवा उदयोजक तथा संचालक रितेश वेगीनवार,सत्कारमुर्ती साईनाथ कोडापे पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसेनजीत डोंगरे,जेष्ठ पत्रकार अरूण वासलवार,मारोती अम्मावार,संतोष बंडावार,विजय पेरकावार आदि मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
साईनाथ कोडापे हे लाठी येथील माजी सरपंच आहेत.आदिवासी समाजातील ते युवा कार्यकर्ते आहेत.गेल्या अनेक वर्षापासून ते विविध सामाजिक कार्यात आपली सक्रिय भुमिका बजावित आहेत.धाबा येथील नाल्यात तिन चिमुकल्यांचे प्राण त्यांनी वाचविले.आपला जिव धोक्यात घालून त्यांनी हि कामगिरी केली.गोंडपिपरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी साईनाथ कोडापे यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी रितेश वेगीनवार यांनी आपल्या मार्गदर्शनातून ग्रामीण भागातील अनेक युवा उदयोजक चांगले काम करित आहेत.समाजासाठी मदतीचीही भुमिका ते ठेवीत आहेत.हा अतिशय चांगला पायंडा आहे.गोंडपिपरी तालुका पत्रकार संघाची मोठी परंपरा आहे.सामाजिक जाणीवा ठेवीत गेली तिस वर्ष हि संघटना दायीत्व जोपासत आहे.हि अभिनंदनीय बाब असल्याचे म्हणत त्यांनी संघाच्या वाटचालीबाबत कौतूक केले.
साईनाथ कोडापे यांनी सत्काराला उत्तर देतांना पत्रकार संघाचे आभार मानले.अशा उपक्रमांनी साामजिक काम करणा-यंांना नवे बळ मिळेल असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मटा चे वरिष्ठ पत्रकार निलेश झाडे यांनी केले.संचालक जेष्ठ पत्रकार सचिन फुलझेले यांनी केले..संदीप रायपुरे,समीर निमगडे,राजकुमार भडके,बाबुराव बोंडे,चंद्रजीत गव्हारे,प्रमोद दुर्गे,दिपक वांढरे,दिलीप बच्चूवार,कुमार पोहणकर,आशिष निमगडे हर्ष महेशकर,राजेश डोंगरे यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
याप्रसंगी सत्कारानंतर कृतज्ञता व्यक्त करित साईनाथ कोडापे यांनी दिपस्तंभ अभ्यासिकेला विस खुच्र्या भेट दिल्यात.यावेळी दिपस्तंभ अभ्यासिकेचे अध्यक्ष अंकुश झाडे,संचालक निखील खोब्रागडे,नितेश चुनारकर यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.

Related posts

कापूस वेचताना मधमाश्यांचा हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर | गोंडपीपरी तालुक्याचे लाठी गावातील घटना

प्रश्न विचारणारेच इतिहास घडवतात; जिद्दीने अशक्यही शक्य होते! | न्यूटनच्या जिज्ञासेपासून शिवरायांच्या दूरदृष्टीपर्यंत प्रा. बानगुडे-पाटील यांनी उलगडले यशाचे सूत्र

वनक्षेत्रातून रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर पकडले | राजुरा वनकर्मचार्याची कारवाई