वनक्षेत्रातून रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर पकडले | राजुरा वनकर्मचार्याची कारवाई

राजुरा(प्रतिनिधी)-

सुमठाना वनक्षेत्रातून अवैधरित्या रेती तस्करी प्रकरणात ट्रॅक्टर मालकाविरुद्ध वनगुन्हा दाखल करून ट्रॅक्टर जप्त करण्यात आले
दिनांक 27 नोव्हेंबर रोजी रात्री राजुरा वनपरिक्षेत्रात वनकर्मचारी गस्त करीत असताना सुमठाणा नियतवनक्षेत्राचे कक्ष क्रमांक 166 मधील नाल्यातून अवैधरित्या ट्रॅक्टर द्वारे रेती तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली माहितीवरून घटनास्थळी संपलं रचून धाड टाकली यावेळी ट्रॅक्टर (क्रमांक Mh34-cj-4827) मध्ये रेती भरून वाहतूक करीत असताना ट्रॅक्टर अडविण्यात आले ट्रॅक्टर थांबवताच ट्रॅक्टर वरील मजूर पडून गेले याची माहिती वनकर्मचार्यानी वरिष्ठ वनधिकार्याना दिली दरम्यान ट्रॅक्टर मालक परवेज अफसर सय्यद राहणार सोंडो हे घटनास्थळी पोहचले असता रेती वाहतूक परवाना विषयी माहिती विचारली असता कोणतीही परवानगीची कागदपत्रे देण्यात आले नाही यामुळे यावेळी ट्रॅक्टर मालक परवेज अफसर सय्यद राहणार सोंडो याचे विरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला व ट्रॅक्टर जप्तीची कारवाई करून वन काष्ठ आगारात जमा करण्यात आला
उपविभागीय वन अधिकारी मंगेश गिरडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे,यांचे मार्गदर्शनात क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते,वनरक्षक पवन मन्दूलवार,संदीप तोडासे,मीनाक्षी सातपुते आणि वनमजुर गंगाधर भेंडारे, राजू देवाडकर यांनी ही कारवाई केली

Related posts

राजुरा जि.प हायस्कुल येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी निमित्य कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा

कापूस वेचताना मधमाश्यांचा हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर | गोंडपीपरी तालुक्याचे लाठी गावातील घटना

प्रश्न विचारणारेच इतिहास घडवतात; जिद्दीने अशक्यही शक्य होते! | न्यूटनच्या जिज्ञासेपासून शिवरायांच्या दूरदृष्टीपर्यंत प्रा. बानगुडे-पाटील यांनी उलगडले यशाचे सूत्र