25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्राचार्य सह लिपीक ताब्यात | पोंभुरणा ITI मधील घटना

राजुरा(प्रतिनिधी)-

शासकीयऔद्योगिक प्रशिक्षण संस्था , पोंभुर्ण येथील महिला कर्मचाऱ्यांच्या पाच महिन्याच्या मानधनाच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागून तडजोडी नंतर २५ हजार रुपये स्वीकारल्या प्रकरणी संस्थेच्या प्राचार्यासह एका लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. या कारवाईमुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील महिला तक्रारदार असून, आरोपीमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पोंभुर्णा येथील प्राचार्य संजय कल्पना खोब्रागडे (वय ५५) आणि कनिष्ठ लिपिक चंद्रशेखर मलिक (वय ४७) यांचा समावेश आहे.

तक्रारदार महिला वायरमन विषयाच्या सैद्धांतिक व प्रात्यक्षिक तासिका घेण्याचे काम करत होती. त्यापोटी तिला सैद्धांतिक तासिकेसाठी प्रतितास २५० रुपये, तर प्रात्यक्षिक तासिकेसाठी प्रतितास १२५ रुपये मानधन मिळत होते. मे, जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि २०२६ या पाच महिन्याचे एकत्रित
मानधन नोव्हेंबरमध्ये मिळाले होते.

मात्र, पाच महिन्याचे मानधन काढून दिल्याचे मोबदल्यात प्राचार्या कल्पना खोब्रागडे यांनी लिपिक नरेंद्र मलिक यांच्या मार्फत ३० हजार रुपयांची लाच मागीतल्याची तक्रार सदर महिलेने लाचलुचप प्रतिबंधक विभागकडे केली होती.
तक्रारींचे अनुषंगाने एसीबी ने पडताडणी केली असता ,तडजोडीअंती 25 हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविण्यात आल्याचे निष्पन्न झाले,त्यानंतर 23 नोव्हेंबर 2026 रोजी एसीबीच्या पथकाने सापळा कारवाई केली यावेळी लाच रकमेतील 25 हजार रुपये स्वीकारताना लिपिक नरेंद्र मलिक याला पकडण्यात आले या प्रकरणात प्राचार्य कल्पना खोब्रागडे यांचाही सहभाग असल्याने दोघांनाही ताब्यात घेण्यात आले

Related posts

राजुरा जि.प हायस्कुल येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी निमित्य कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा

कापूस वेचताना मधमाश्यांचा हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर | गोंडपीपरी तालुक्याचे लाठी गावातील घटना

प्रश्न विचारणारेच इतिहास घडवतात; जिद्दीने अशक्यही शक्य होते! | न्यूटनच्या जिज्ञासेपासून शिवरायांच्या दूरदृष्टीपर्यंत प्रा. बानगुडे-पाटील यांनी उलगडले यशाचे सूत्र