सहकारी बँकेच्या वसुली प्रतिनिधीचा संशयास्पद मृत्यू हत्या की अपघात?

राजुरा (प्रतिनिधी):
राजुरा येथील एका सहकारी बँकेतील कर्जवसुली प्रतिनिधी चंद्रशेखर आडे वय 35 वर्ष यांचा मृत्यूदेह संशयास्पद अवस्थेत भुरकुंडा ते रामनगर नर्सरी जवळ आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
राजुरा येथून कार्यालयीन कर्तव्य करून भुरकुंडा मार्गे नेहमीप्रमाणे नाईकनगर,(चिंबली) स्वगृही जात होते दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री भुरकुंडा खुर्द मार्गे घरी जाण्यास स्वताचे दुचाकीने निघाले रात्री उशिरापर्यंत चंद्रशेखर आले नसल्याने कुटूंबीय चिंतेत होते. मोबाईलवर सुद्धा बंद होते, दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 9 वाजता चंद्रशेखर भुरकुंडा ते रामनगर नर्सरी कडे जाणाऱ्या मार्गावर मृतावस्थेत आढळून आला आणि घटना उघडकीस आली.त्याच्या नाकातोंडातून पांढरा फेस निघालेला होता घटनास्थळी त्याची दुचाकी उभी होती, मात्र हेल्मेट,मोबाईल,बॅग,आढळून आली नाही

घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची ओळख पटवली. पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची (मर्ग) नोंद केली असली, तरी कुटुंबीय व ग्रामस्थांनी हा अपघात नसून हत्या असल्याची तीव्र शंका व्यक्त केली आहे आणि प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे
माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सुमित परतेकी,सहायक पोलिस निरीक्षक हेमंत पवार,लक्ष्मण लोकरे घटनास्थळी पोहचले पुढील तपास सूरु आहे

Related posts

राजुरा जि.प हायस्कुल येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी निमित्य कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा

कापूस वेचताना मधमाश्यांचा हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर | गोंडपीपरी तालुक्याचे लाठी गावातील घटना

प्रश्न विचारणारेच इतिहास घडवतात; जिद्दीने अशक्यही शक्य होते! | न्यूटनच्या जिज्ञासेपासून शिवरायांच्या दूरदृष्टीपर्यंत प्रा. बानगुडे-पाटील यांनी उलगडले यशाचे सूत्र