राजुरा शहरात दोघांच्या गळफास घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या?

राजुरा, (प्रतिनिधी)-
राजुरा शहरातील दोघांनी वेगवेगळ्या ठिकाणी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक 7 जानेवारी रोजी घडली ,या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून बंडू घोटेकर,आणि प्रभाकर देवाडकर असे मृतकाचे नाव आहेत
प्राप्त माहितीनुसार राजुरा पासून 12 किलोमीटर अंतरावरील वरूर रोड येथे निलेश डहाके यांच्या शेतात वेकोली कर्मचारी बंडू घोटेकर, वय ५५ राहणार जवाहरनगर वार्ड राजुरा यांनी गळफास घेत जीवनयात्रा संपविली. यापूर्वी त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. बंडू धोटेकर हे वेकोलिच्या सास्ती ओपनकास्ट कोळसा खाणीत कार्यरत होते.
दुस-या घटनेत राजुरा येथील राहणारा प्रभाकर देवाळकर, वय ४२ यांनी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
एकाच दिवशी दोन गळफास घेऊन आत्महत्या च्या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे

दरम्यान घटनेची माहिती होताच राजुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुमित परतेकी यांचे मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला आहे,आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही

Related posts

राजुरा जि.प हायस्कुल येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी निमित्य कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा

कापूस वेचताना मधमाश्यांचा हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर | गोंडपीपरी तालुक्याचे लाठी गावातील घटना

प्रश्न विचारणारेच इतिहास घडवतात; जिद्दीने अशक्यही शक्य होते! | न्यूटनच्या जिज्ञासेपासून शिवरायांच्या दूरदृष्टीपर्यंत प्रा. बानगुडे-पाटील यांनी उलगडले यशाचे सूत्र