वन विकास महामंडळ च्या दुर्लक्षित पणात झरण ,कन्हाळगाव अभयारण्य वणव्याने होरपळला?

राजुरा(प्रतिनिधी)-

मध्य चांदा वनविकास महामंडळ अंतर्गत कन्हाळगाव अभयारण्य अंतर्गत झरण,कन्हाळगाव,तोहोगाव, धाबा हे वनपरिक्षेत्र समाविष्ठ आहे येथील वनकर्मचार्याच्या दुर्लक्षित कारभारामुळे या वनक्षेत्रात मोठया प्रमाणात आग लागून वन संपत्ती जळून राख होत आहे ,आणि वन्यजीवांची सुद्धा धावाधाव होत आहे
आज तर झरण ते कोठारी दरम्यान वनक्षेत्रात आग लागल्याने या जंगलातून जाणाऱ्या कोठारी आलापल्ली महामार्गावर काही काळ वाहन चालकांनी वाहने थाबवून दिली होती एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागली असताना ती आग विझविण्यासाठी प्रयत्न करण्यात अपयशी ठरत आहेत
जंगलात मोठ्या प्रमाणात मृत झालेला बांबू आहे ते बांबू काढून स्वच्छता करण्याचे कामे देण्यात आले परंतु संबंधित ठेकेदाराकडून अजूनपर्यंत पूर्ण बांबू काढण्यात आलेले नाही विशेष म्हणजे या महामंडळाचे कर्मचाऱयांनी एप्रिल महिन्यात अग्निरेषा जाळण्याचा उरफाटा कारभार केला आहे यामुळे सुध्दा आग पसरण्याचा धोका वाढलेला आहे
परिणामी लाखो रुपयांची वनसंपदा आगीत जळून जात आहे सुक्ष्म जीवजंतू होरपळून जात आहेत तर वाघ बिबट,चितळ,रानगवे यासारख्या वन्यप्राण्यांची चागलीच धावपळ होत आहे

Related posts

कापूस वेचताना मधमाश्यांचा हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर | गोंडपीपरी तालुक्याचे लाठी गावातील घटना

प्रश्न विचारणारेच इतिहास घडवतात; जिद्दीने अशक्यही शक्य होते! | न्यूटनच्या जिज्ञासेपासून शिवरायांच्या दूरदृष्टीपर्यंत प्रा. बानगुडे-पाटील यांनी उलगडले यशाचे सूत्र

वनक्षेत्रातून रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर पकडले | राजुरा वनकर्मचार्याची कारवाई