मध्य चांदा वन विभाग अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची कार्यशाळा.

जखमी तथा मृत वन्यजीव बाबत घ्यावयाची दक्षता तसेच वन्यजीवांचे वातावरणीय झालेला बदल यावर मार्गदर्शन.

राजुरा(प्रतिनिधी)-

मध्य चांदा वनविभागाचे वतीने वन विश्राम गृह, चंद्रपूर येथे Management of Tiger Outside Tiger Reserve (TOTR): Strategies to deal with Human- Tiger Conflict या योजनेअंतर्गत Dealing with Problematic Wild Animals and Animals in Distress या विषयावर मध्य चांदा वन विभागातील विविध तालुक्यात कार्यरत पशु वैद्यकीय अधिकारी व वन विभागाचे अधिकारी यांची कार्यशाळा घेण्यात आली.
सदर कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी मध्य चांदा वन विभागाचे उपवनसंरक्षक योगेश वाघाये उपस्थित होते तर डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी, TATR, चंद्रपूर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ. भास्कर रामटेके, सहाय्यक आयुक्त, तालुका पशुसंवर्धन अधिकारी, गोंडपिपरी आणि डॉ. प्रमोद जल्लेवार, पशुधन विकास अधिकारी, जि.प. चंद्रपूर हे उपस्थित होते.
सदर कार्यशाळेत मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना घडत असताना किंवा मानवी वस्तीत वन्य प्राण्याच्या शिरकावामुळे मनुष्याच्या वाढलेल्या जमावामुळे वन्यप्राण्यांच्या वागणुकीमध्ये बदल घडून येतो. सदर घडणाऱ्या बदलामुळे संघर्षाच्या घटना घडू नये याकरिता वन विभागाचे कर्मचारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांना समन्वय साधून काळजी घेणे उपयुक्त ठरते याबाबत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची भूमिका काय असायला हवी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच वन्यप्राण्यांच्या शवाचे शव विच्छेदन करीत असताना घ्यावयाची काळजी तसेच sample घेत असताना कश्या प्रकारे घ्यावयाचे याबाबत सुद्धा मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे संचालन वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे, यांनी केले व प्रास्ताविक उपविभागीय वन अधिकारी मंगेश गिरडकर, यांनी केले आणि आभार प्रदर्शन वनपरिक्षेत्र अधिकारी महेश दीघे यांनी केले.
सदर कार्यशाळा यशस्वी करण्याकरिता राजेंद्र घोरुडे, वैभव राजूरकर, सुरेखा मुरकुटे, गजानन इंगळे, अनंत राखुंडे यांनी सहकार्य केले

Related posts

कापूस वेचताना मधमाश्यांचा हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर | गोंडपीपरी तालुक्याचे लाठी गावातील घटना

प्रश्न विचारणारेच इतिहास घडवतात; जिद्दीने अशक्यही शक्य होते! | न्यूटनच्या जिज्ञासेपासून शिवरायांच्या दूरदृष्टीपर्यंत प्रा. बानगुडे-पाटील यांनी उलगडले यशाचे सूत्र

वनक्षेत्रातून रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर पकडले | राजुरा वनकर्मचार्याची कारवाई