राजुरा(प्रतिनिधी)
घरफोडीसह दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास राजुरा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकांनी 1 लाख 40 रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली आहे
राजुरा येथील राजीव गांधी चौकातील सुधीर जयपूरकर यांची दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार राजुरा पोलीस ठाण्यात केली होती याबद्दल गुन्हा नोंदवून ठाणेदार नितीन चिंचोळकर यांचे नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण लोकरे आणि पथकाचे कर्मचारी गुन्हातील आरोपीचा शोध सुरू केला गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणावरून सोनू उर्फ चड्डा बुधाजी दहिवडे वय 30 वर्ष डाँआंबेडकर चौक वार्ड नंबर 2 दुर्गापूर चंद्रपूर यास ताब्यात घेतले व आरोपीची कसून चौकशी केली असता आरोपिकडून गुन्ह्यातील दुचाकी,2 अँड्रॉइड मोबाईल,आणि तेलंगणा राज्यातील अल्वाल पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील दुचाकी जप्त करण्यात आले तसेच राजुर्यातील एक घरफोडीचा गुन्हा देखील उघडकीस आला आहे याआरोपिकडून दोन दुचाकी 2 अँड्रॉइड मोबाईल असा 1 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष्य नोपानी,तसेच अप्पर पोलीस अधीक्षक,उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांचे नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण लोकरे,पोलीस उपनिरीक्षक सुनील धांडे,सहायक फौजदार किशोर तुमराम,हवालदार विक्की निर्वाण,अनुप डांगे,महेश बालगोडवार,शफीक शेख,मिलिंद जांभूळे,रमेश बस्सी,राजीव दुबे यांनी केले