वाघाचे हल्यात गुराखी ठार, वन विकास महामडळाचे सातारा भोसले वनक्षेत्रातील घटना

राजुरा(प्रतिनिधी):

वन विकास महामंडळ चंद्रपूर विभाग अंतर्गत येणाऱ्या जुनोना वनपरिक्षेत्राच्या सातारा भोसले वनक्षेत्रात वाघाने गुराख्यावर हल्ला करून ठार केल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक 23 जुलै रोजी दुपारी उघडकीस आली उष्टु पोरते वय 55 वर्ष असे मृत व्यक्तीचे नाव आहे
मृतक उष्टु पोरते आपल्या सहकार्यासोबत सातारा भोसले वनक्षेत्रात गुरे चराई साठी गेला होता दुपारचे वेळेस हे गुराखी आपसात चर्चा करीत असताना अचानक पणे त्या परिसरात असलेल्या वाघाने उष्टु पोरते यांचेवर हल्ला केला आणि ठार केले तर दुसरे व्यक्ती हे बाजूच्या झाडावर उंच ठिकाणी जाऊन बसले थोड्यावेळ झाल्यानंतर घटनेची माहिती त्यांनी गावात येऊन सांगितली माहिती मिळताच जुनोना येथील वन विकास महामंडळाचे कर्मचारी,पोलीस,आणि ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले वन अधिकाऱयांनी घटनास्थळाचा पंचनामा केला यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले होते बर्याच प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढून चंद्रपूर येथे उत्तरीय कार्यवाईस पाठविण्यात आले मृतकाचे कुटूंबियांना वन विकास महामंडल कडून तात्काळ 50 हजार रुपयाचे मदत देण्यात येत असून उर्वरित आर्थिक मदत पुढील सोपस्कार झाल्यानंतर देण्यात येईल असे वन विकास महामंडळ चे अधिकाऱयांनी सांगितले.

Related posts

राजुरा जि.प हायस्कुल येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी निमित्य कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा

कापूस वेचताना मधमाश्यांचा हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर | गोंडपीपरी तालुक्याचे लाठी गावातील घटना

प्रश्न विचारणारेच इतिहास घडवतात; जिद्दीने अशक्यही शक्य होते! | न्यूटनच्या जिज्ञासेपासून शिवरायांच्या दूरदृष्टीपर्यंत प्रा. बानगुडे-पाटील यांनी उलगडले यशाचे सूत्र