वाघाचे हल्यात मेंढपाळ ठार

पोंभुरणा(संतोष कुंदोजवार)-
शेतातील बकऱ्याचे रक्षणासाठी कुटूंबासह जागरण करणाऱ्या एका मेंढपाळावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घोसरी उपवनक्षेत्राचे फिस्कृटी शेतशिवारात 13 मार्च च्या रात्री साडे बाराचे सुमारास घडली वासुदेव गणपत कांकलवार वय 37 वर्ष राहणार जुनासुर्ला असे मृतकाचे नाव आहे
पोंभुरणा वनपरिक्षेत्राच्या घोसरी उपवन क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या फिस्कृटी येथील रामदास जेंगठे यांचे शेतात वासुदेव कांकलवार आपल्या कुटूंबासह बकऱ्याचे कळप घेऊन रात्री मुक्कामी होते रात्री साडेबाराच्या सुमारास नेहमी प्रमाणे बकऱ्याचे सुरक्षिततेसाठी फेरफटका मारून जेमतेम कुटूंब झोपी गेले होते इतक्यात बकऱ्याचे ओरडण्याचा आवाज आल्याने वासुदेव जागा झाला आणि बकऱ्याचे दिशेने जाताच दबा धरून असलेल्या वाघाने हल्ला करून वासुदेव यास जागीच ठार केले या आवाजात कुटूंबातील भाऊ ,वहिनी जागे होऊन आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला परंतु तोपर्यत वासुदेव यांचा मृत्यू झाला


घटनेची माहिती ग्रामस्थांना होताच ग्रामस्थानी घटनास्थळी गर्दी केली पोंभुरणा वन कार्यालयात माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधीकारी ,कर्मचारी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आणि शवविच्छेदन करीता मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले
वन विभागाचे वतीने तात्काळ आर्थिक मदत म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी ए डब्लू राखुंडे यांनी मृतकाचे नातवाईकास 50 हजार रुपयांची मदत केली आहे घटनास्थळी उपवनसंरक्षक ,सहायक वनसंरक्षक,इतर वनाधिकारी यांनी भेट दिली असून पुढील उपाययोजना बाबत क्षेत्रीय वनकर्मचार्याना मार्गदर्शन केले

या घटनेमुळे परत एकदा ग्रामस्थांना वाघाची दहशत पसरली असून वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे

Related posts

कापूस वेचताना मधमाश्यांचा हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर | गोंडपीपरी तालुक्याचे लाठी गावातील घटना

प्रश्न विचारणारेच इतिहास घडवतात; जिद्दीने अशक्यही शक्य होते! | न्यूटनच्या जिज्ञासेपासून शिवरायांच्या दूरदृष्टीपर्यंत प्रा. बानगुडे-पाटील यांनी उलगडले यशाचे सूत्र

वनक्षेत्रातून रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर पकडले | राजुरा वनकर्मचार्याची कारवाई