कोरपन्यात महत्त्वाच्या पदांवर महिलाराज प्रशासन, न्यायव्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्थेत महिलांची प्रभावी धुरा.

कोरपना :

महिलांनी आज प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला असून, कोरपना शहरातही विविध महत्त्वाच्या प्रशासकीय व जबाबदारीच्या पदांवर महिलांची प्रभावी उपस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे “महिलाराज” अशी सकारात्मक चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.

कोरपना नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी नंदाताई बावणे कार्यरत असून शहर विकासाच्या विविध कामांना गती देण्याचे कार्य त्या करीत आहेत. न्यायव्यवस्थेत न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून सहारे मॅडम जबाबदारी सांभाळत आहेत. महसूल प्रशासनात तहसीलदार पल्लवी आखरे तसेच नायब तहसीलदार करिष्मा वासेकर कार्यरत असून नागरिकांच्या विविध प्रशासकीय कामांना तत्परतेने न्याय देत आहेत.

कायदो व सुव्यवस्था राखण्याची महत्त्वाची जबाबदारीही महिलांच्या खांद्यावर असून कोरपना पोलीस ठाण्याच्या ठाणेदारपदी लता वाढिवे कार्यरत आहेत. तसेच महिला व बालकल्याणाशी संबंधित योजनांची अंमलबजावणी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी झाडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

एकाच तालुक्यात प्रशासन, न्यायव्यवस्था, पोलीस विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचे नेतृत्व दिसून येणे ही कोरपन्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. महिलांच्या या नेतृत्वामुळे अनेक तरुणींना प्रेरणा मिळत असून “महिला सक्षम तर समाज सक्षम” हा संदेशही यातून अधोरेखित होत आहे.

Related posts

कापूस वेचताना मधमाश्यांचा हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू तर मुलगा गंभीर | गोंडपीपरी तालुक्याचे लाठी गावातील घटना

प्रश्न विचारणारेच इतिहास घडवतात; जिद्दीने अशक्यही शक्य होते! | न्यूटनच्या जिज्ञासेपासून शिवरायांच्या दूरदृष्टीपर्यंत प्रा. बानगुडे-पाटील यांनी उलगडले यशाचे सूत्र

वनक्षेत्रातून रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर पकडले | राजुरा वनकर्मचार्याची कारवाई